विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार, निवडणूक आयोग आज तारीख जाहीर करणार!

 केंद्रीय निवडणूक

 केंद्रीय निवडणूक आयोग आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या

विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे.

आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून

Related News

यावेळी निवडणूक आयोग या दोन राज्यांसाठीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम

सार्वजनिक करणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचा

निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साधारण 2009 सालापासून तीन वेळा महाराष्ट्र आणि हरियाणा

या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका सोबतच आयोजित केल्या जातात.

निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीला या दोन्ही राज्यांचा

निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर केला जातो. मात्र यावेळी फक्त

हरियाणा राज्याचाच विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

हरियाणातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ येत्या नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून

हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार केली जात आहे.

याच तयारीचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनी

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. त्यानंतर केंद्रीय गृहसचिव

अजय भल्ला यांच्यासोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली.

निवडणुकीदरम्यानच्या सुरक्षेबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी तीन वाजता

फक्त पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले जात आहे. या पत्रकार परिषदेत

निवडणूक आयोग नेमकं कोणत्या राज्यांसाठी निवडणुका जाहीर करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-should-reveal-his-support-to-uddhav-thackeray/

Related News