राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘घरातील सगळे वाद संपू दे, असं विठुरायाला साकड घातल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घरातील जेष्ठ व्यक्तींना हे वाटणं साहजिक असल्याचं मिटकरी म्हणाले.
तर हे एका कडून वाटू नये तर दोन्हीकडून वाटावं असेही मिटकरी म्हणाले.
तर कार्यकर्ता म्हणूनही आमची ही भावना राहिला असल्याचं ते म्हणाले.
तर आता काय करायचं ते परिवारातील लोक एकत्र येऊन करतील अशी मला अपेक्षा असल्याचं मिटकरी म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/give-grant-under-employment-hami-yojana-otherwise-i-will-give-up-food-and-make-a-request-to-the-district-magistrate-of-shetkariya/