सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा

सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले. उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ मिळेपर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मर्यादित सुविधा सुरू केल्या.

शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.

उपलब्ध मनुष्यबळ आणि संसाधने लक्षात घेता टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ मिळेपर्यंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मर्यादित सुविधा सुरू केल्या.

” याचा अर्थ, फक्त शासकीय सर्वोपचार रुग्णालया मधून रेफर केलेल्या रुग्णांवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात.

Related News

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे शासकीय सर्वोपचार रुग्णांलयाशी संलग्न आहे.

शासकीय सर्वोपचार रुग्णालया मधून रेफर केलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी मध्ये जाण्यासाठी हॉस्पिटलच्या मागुन प्रवेशद्वार आहे.

परंतु हे प्रवेशद्वार संध्याकाळी ०६:०० वाजल्यानंतर बंद करण्यात येते.

शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून एमर्जेंसी मध्ये सुपर हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी ऑटो रिक्शा चा वापर करावा लागतो.

त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

म्हणून सर्वोपचार रुग्णालय प्रसाशनाचा मनमानी कारभार थांबऊन ताबडतोब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

चे मागील बाजुचे प्रवेशद्वार खुले करून २४ तास उघडे करण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल.

अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे व समिर खान

यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिष्ठता मिनाक्षी गजभिये यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

Read More https://ajinkyabharat.com/8-candidates-declared-under-sambhaji-rajes-third-alliance/

Related News