विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम

जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांची माहिती

 

अकोला, दि. 4 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार  प्रत्यक्ष लढवत आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडील दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रेस नोटद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या कालावधीत एकूण 129 उमेदवारांकडून 180 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले होते. दि. 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या छाननीत एकूण 16 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरविण्यात आले होते, एकूण 113 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते.
सदर 113 उमेदवारांपैकी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत दि. 4 नोव्हेंबर दु. 3 वा. पर्यंत एकूण 43 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, एकूण 70 उमेदवार हे प्रत्यक्ष निवडणूक लढवत आहेत, असे त्यांनी सांगितले.
बाळापूर येथे उमेदवारांची संख्या अधिक असल्याने दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची संख्या 15 किंवा त्यापेक्षा कमी असल्याने एक बॅलेट युनिट राहील.

Related News

Related News