आणखी एक धक्कादायक घटना! बाजार समिती परिसरातील डॉक्टरच्या घरात चोरी,

आणखी एक धक्कादायक घटना! बाजार समिती परिसरातील डॉक्टरच्या घरात चोरी,

बार्शी | प्रतिनिधी

बार्शी शहरातील बाजार समिती परिसरात आणखी एका घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

या वेळी स्थानिक डॉक्टरच्या निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारला असून,

Related News

१० तोळे सोनं आणि ३० हजार रुपयांची रोकड घेऊन चोर पसार झाले आहेत.

ही घटना १७ मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

कुलूप तोडून घरात प्रवेश

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अजित देशमुख हे त्यांच्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी

त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे उचकटून

सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीचा अंदाजे एकूण ऐवज ६.५ लाख रुपयांच्या घरात आहे.

 बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

डॉ. देशमुख यांच्या मुलीने घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले आणि याबाबत बार्शी शहर

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट

देऊन फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

 शहरात घरफोडींचा वाढता सत्र

पाथरीतील न्यायाधीशांच्या घरातील मोठ्या चोरीच्या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच घडलेली

ही दुसरी घटना असून, शहरात घरफोड्यांचं सत्र वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचं

वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/india-test-captain-2025-shubman-gilkade-kasoti-sanghachi-dhura-gambhirbat-5-tasanchi-meeting/

Related News