Pravin Darekar : “आम्हाला विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याची आवश्यकता नाही.
ते आधीच इतके दबलेले आहेत की, त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. अधिवेशनात विरोधी पक्षाची छाप,
अस्तित्व दिसत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं आत्मपरिक्षण करावं, जनतेच्या प्रश्नांवर बोलावं.
Related News
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी फरहान अमीन यांचा पुढाकार; मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आश्वासन
पोलीस अधीक्षक मा. अर्चित चांडक यांच्या हस्ते विद्यार्थिनींचा गौरव.
कापूस खरेदी व ज्वारी खरेदी घोटाळ्याची sit चौकशी होणार
पोस्टे खदान पोलिसांची मोठी कामगिरी – ११ घरफोड्यांचे गुन्हे उघड, १४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोलवड गावात दुर्दैवी घटना :
बीडमध्ये धक्कादायक घटना: दफनविधीवेळी मृत घोषित केलेलं नवजात बाळ निघालं जिवंत!
कर्तव्यदक्ष रास्त भाव धान्य दुकानदारांचा प्रमाणपत्र देउन सत्कार व सन्मान
गांधीग्राम येथे कावड यात्रेपूर्वी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पूर्णा नदी घाटाची पाहणी
राजराजेश्वर महाराजांच्या कावड यात्रेसाठी प्रशासन सज्ज; मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महासचिव पदी विकास पवार यांची नियुक्ती
गुरुपौर्णिमा: ज्ञान, कृतज्ञता आणि सद्गुणांचा पवित्र उत्सव
इंझोरीत शेतकऱ्यांना दुबार संकट; २०० एकरावर पेरणी खोळंबली,
आम्हाला त्यांना दाबण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या जनतेच काम करणं हा आमचा अजेंडा आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र, हिंदुस्थान आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नखाची सर सुद्धा अनिल परब यांना नाही”
अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
“छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या
आमच्यासारख्या शिवभक्तांनी पायऱ्यांवर अनिल परब यांचा धिक्कार केला.
छत्रपती संभाजी महारांजासोबत स्वत:ची तुलना केली,
त्या बद्दल अनिल परब यांनी सभागृहात माफी मागावी,
अन्यथा त्यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
‘…तर जशास तसा धडा शिकवला जाणार’
“अनिल परब यांचं वक्तव्य असंसदीय, शोभणार नाही. सभागृहात त्यांनी माफी मागावी.
अन्यथा त्यांना सळो की पळो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.
हा अहंकार आला कुठून? छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा स्वत:ला मोठे समजता का? एवढी मुजोरी,
माज कोणी करणार असेल, तर जशास तसा धडा शिकवला जाणार” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही
“अबू आझमीप्रमाणे अनिल परब यांच्या निलंबनासाठी 100 टक्के आग्रही आहोत. नाक्यावरची भाषा सभागृहात बोलून चालणार नाही.
सभागृहाकडे महाराष्ट्राच लक्ष असते. अनिल परब यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून आम्ही या ठिकाणी पायऱ्यांवर आंदोलन केलं” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/bjp-khasdar-tejashwi-surya-adkle-lagna-bandhanat-wife/