अकोला जिल्हाधिकारी पदी वर्षा मिणा यांची नियुक्ती

जिल्हाधिकारी

अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची अचानक  बदली; 

अकोला : प्रशासनातील मोठ्या बदलाचा भाग म्हणून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची बदली करण्यात आली आहे.अशी माहिती विश्वनीय सूत्रांकडून मिळाली आहे .

त्यांच्या जागी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) वर्षा मिणा यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते .

शासनाच्या आदेशानुसार येत्या काही दिवसांत त्या पदभार स्वीकारणार आहेत.

अजित कुंभार यांचा कार्यकाळ

अकोला जिल्ह्यातील विविध विकासकामे, आपत्ती व्यवस्थापन, पिकविमा विषयक कामकाज, पुरपरिस्थिती व निवडणूक प्रक्रिया पार पाडताना अजित कुंभार

यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. विशेषतः अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दुष्काळी परिस्थितीत तातडीने निर्णय घेऊन प्रशासनाला दिशा दिली,

असे मानले जाते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी गतीमान झाली.

नव्या जिल्हाधिकाऱ्यांविषयी माहिती

वर्षा मिणा ह्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2018 बॅचच्या आयएस अधिकारी आहेत.. जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना वर्षा मीना यांनी त्यांचे पती

विकास मीना यांच्यासह जालना जिल्ह्यातील दरेगाव गावातील अंगणवाडी मध्ये आपल्या मुलाचा प्रवेश घेऊन समाजासमोर एक मोठा

आदर्श निर्माण केला आहे.

प्रशासनातील हालचालींना वेग

अकोल्यात वर्षा मिणा यांचे आगमन ही एक महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.

महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही नियुक्ती असल्याने जिल्ह्यात विशेष उत्सुकता आहे.

तर, अजित कुंभार यांची बदली कोणत्या नवीन पदावर झाली आहे, याची माहिती लवकरच जाहीर होणार आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/75-tasantant-great-dharanatun-jalwisarg-closed-pani-satha-404/