अनंत अंबानी लालबागचा राजा गणपती मंडळात मानद सदस्य!

लालबागचा

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सदस्यांमध्ये

एका हायप्रोफाईल व्यक्तीचा समावेश झाल आहे. रिलायन्स

समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी

Related News

असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची या मंडळात मानद सदस्य म्हणून

नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मंडळात ते प्रमुख

सल्लागार म्हणून कार्यकारी समिती मध्ये कार्यरत असतील.

लालबागचा राजा गणपती जगभरातील गणेशभक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ख्याती आहे. वर्षातून केवळ

एकदाच आणि गणेशोत्सव काळातच येणाऱ्या या बाप्पाचे दर्शन

घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर देश आणि जगभरातील भक्तांची गर्दी असते.

लालबाचा राजा गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा

नुकतीच पार पडली. या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.

ज्यामुळे अनंत अंबानी यांचा मानद सदस्य म्हणून निवडीचा मार्ग मोकळा झाला.

अंबानी कुटुंबाने धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा विचार

करुन त्यांचा मंडळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. सर्वत्र बाप्पाच्या

आगमनाची तयारी सुरु झाली असून, बाजार गर्दीने फुलून गेले आहेत.

विविध मंडळांचे सदस्य देखावे उभे करण्यात रंगून गेले आहेत. दुसऱ्या बाजूला

मुंंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज झाले आहेत.

पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/anil-deshmukhs-crime-registered-against-cbi-thanks-to-the-deputy-chief-minister/

Related News