अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची हजेरी

नागपूर

नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील

बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

Related News

तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा,

अकोला, अमरावती, गडचिरोलीसह यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील

मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना

पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे.

तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील,

असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.

सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली.

या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत.

तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत.

नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय.

या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी

आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली.

तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे.

शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी,

अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/modi-3-0-died-in-the-first-15-days-terrorist-noise-scam/

Related News