अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र

दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या

तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ते विधानसभा

Related News

निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. तसेच भाजप

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी

अमित शहा हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत

आहेत. आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील

दौरे वाढले आहेत, अशी चर्चा रंगली आहे. अमित शाह हे आज

नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पक्षाच्या

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर रात्री उशिरा

संभाजीनगरमध्ये पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद

साधत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

त्यानंतर बुधवारी ते नाशिक आणि कोल्हापूरमधील

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती समोर आली आहे.

या दोन्हीही भेटीत अमित शाह हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत

विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतील.

Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patils-health-is-not-clear/

Related News