यवतमाळ – ‘रक्षाबंधनाचा पवित्र धागा (रक्षासूत्र) आणि ’आम्ही आमच्या देवा भाऊंच्या सदैव पाठीशी’हे कृतज्ञतेचे शब्द व्यक्त करीत (दि .१८ ) यवतमाळ जिल्ह्यातील
एक लाख 25 हजार (सुमारे सव्वालाख) बहिणींनी, आपले ’देवा भाऊ’ अर्थात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना रक्षासूत्र पाठविले आहे.
‘शासनाच्या योजनेतून मिळालेल्या आर्थिक सक्षमतेबद्दल, या लाडक्या बहिणींनी पत्रांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे.
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणींच्या नात्याचा पवित्र सण. याच सणाला यवतमाळ जिल्ह्यात एका अनोख्या सामाजिक आणि भावनिक उपक्रमाची जोड मिळाली.
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने, ’आपला भाऊ, देवा भाऊ’ या उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील सुमारे एक लाख 25 हजार महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी
राख्या पाठविल्या. या राख्या, राज्याचे माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते मदन येरावार आणि जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडे भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापूरे आणि
इतर पदाधिकार्यांनी सुपूर्द केल्या. या राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी, भाजपने महिलांना मानधन सुरू करून आर्थिकदृष्ट्या सबळ
करण्याचा प्रयत्न केला होता. याच निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, महिलांनी राख्यांसोबत भावनिक पत्रेही लिहिली आहेत. याप्रसंगी जिल्हा महामंत्री रेखा कोठेकर, प्रदेश
चिटणीस माया शेरे, माजी जिल्हाध्यक्ष कीर्ती राऊत, अनुसूचित जाती मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष निर्मला विणकरे, जिल्हा सहसंयोजिका माधुरी केवटे यांच्यासह महिला मोर्चाच्या अनेक
कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सर्व प्रभारी, संयोजिका, सहसंयोजिका यांनी परिश्रम घेतले.
Read also :
https://ajinkyabharat.com/state-mussadhar-pavasacha-kahr-kol-special-session/