वाढलेले वय आणि बोलण्यातील चुका यामुळे वादात असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
जो बायडेन यांनी अखेर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Related News
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
“आर्यन खान तुरुंगात फक्त फळं आणि पाण्यावर;
बायडेन यांनी पत्र लिहून याची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बायडेन यांची प्रकृती आणि बोलण्यातील चुका पाहून
लोक त्यांच्या उमेदवारीवर चर्चा करत होते.
डिबेटमध्ये देखील बायडेन ट्रम्प यांच्यापासून पिछाडीवर पडत चालले होते.
अशातच भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांना उमेदवार केले जावे
अशीही मागणी जोर धरत होती. परंतू, या चर्चावर बायडेन यांनी अनेकदा
आपण काहीही झाले तरी उमेदवारी मागे घेणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लाईव्ह डिबेटचा एक महत्वाचा टप्पा असतो.
यामध्ये ते ट्रम्प यांच्याविरोधात अनेकदा चर्चा करतेवेळी अचानक थांबले होते.
यामुळे ट्रम्प ताकदवर होताना दिसत होते.
अशावेळी बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाजुला करावे अशी मागणी होत होती.
अखेर रविवारी बायडेन यांनी पक्षाच्या आणि देशाच्या हितासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
बायडेन यांचे वय ८१ वर्षे असून त्यांचा विरसभोळेपणा वाढत चालला होता.
यामुळे ते खूप अॅक्टीव्ह दिसत नव्हते. या कारणाने त्यांचे समर्थकही निराश झाले होते.
आता डेमोक्रेट पार्टीकडून कमला हॅरीस यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार बनविले जाऊ शकते.
याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
यावेळी बायडेन यांनी कमला हॅरीस यांना समर्थन दिले आहे.
मी नामनिर्देशन न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी
राष्ट्राअध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
2020 मध्ये राष्ट्राच्या उप राष्ट्रपती पदी कमला हॅरिस यांना नामनिर्देशित करणे
हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता, असे बायडेन म्हणाले.