उमरा येथे गोरगरीबांसाठी ॲम्ब्युलन्स सेवा लवकरच

ॲम्ब्युलन्स

प्रतिनिधी : रामेश्वर कावरे

उमरा (ता. अकोट) : गावातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जय ब्रम्हांडनायक फाऊंडेशन व जय ब्रम्हांडनायक ग्राम सुधार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच गावात ॲम्ब्युलन्स सेवेची सुविधा सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा मर्यादित असल्याने हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या सेवेची सुरुवात संस्थापक मार्गदर्शक बिजेवार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनचे अध्यक्ष रामेश्वर कावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या उपक्रमात कोषाध्यक्ष गोपाल वासनकर, सचिव राम बोंद्रे, सहसचिव संजय सुरळकर, कोषाध्यक्ष प्रविण थोरात आणि सदस्य प्रविण धोंडेकर सक्रिय सहभाग घेत आहेत.

तसेच जय ब्रम्हांडनायक ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष दिनकर उघळकार व उपाध्यक्ष उमाकांत इंगळे यांनी या उपक्रमाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. या ॲम्ब्युलन्स सेवेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फाऊंडेशनकडून नागरिकांना आणि दानशूर संस्थांना या सामाजिक उपक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेतील कमतरता कमी होण्यास मदत होईल आणि गरजू नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी सोय होईल.या उपक्रमाद्वारे उमरा गावात आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/establishment-of-red-ribbon-club-in-colleges-to-create-hiv-awareness-among-students/