अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभ!

काश्मीर मधील

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली.

यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीने बालटाल आणि तुनवान येथील

बेस कॅम्पमधून दक्षिण काश्मीर हिमालयातील ३,८८० मीटर उंचीवरील

Related News

गुंफा मंदिराकडे प्रवास सुरु केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनंतनागमधील पारंपरिक ४८ किलोमीटरचा जुनवान-पहलगाम मार्ग

आणि गांदरबलमधील १४ किलोमीटरचा लहान पण उंच बालटाल मार्गावरून पहाटे यात्रेकरू रवाना झाले.

उपायुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागरी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित

दुहेरी मार्गावरील वात्रेला प्रारंभ झाला.

लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी ४,६०३ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला

जम्मूमधील भगवती नगर बेथोल वात्री निवास बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवला.

हे यात्रेकरू शनिवारी दुपारी काश्मीर खोऱ्यात दाखल झाल्यानंतर

त्यांचे स्थनिक नागरिक आणि प्रशासनाने स्वागत केले.

अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस

आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत.

यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे.

५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.

शनिवारी १८८१ यात्रेकरूंची दुसरी तुकडी भगवती नगर बेस कॅम्प येथून चोख सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.

Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-shinde-has-completed-two-years-on-ex-platform-post/

Related News