अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ‘ख्वाजा’ नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-देवतांची चित्रे आणि आरती छापलेले नॅपकिन्स दिले
Related News
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
गेल्यामुळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हॉटेलमध्ये जोरदार गोंधळ घातला.
प्राप्त माहितीनुसार, ख्वाजा नावाच्या हॉटेलमध्ये बिर्याणी आणि इतर
नॉनवेज पदार्थांसोबत असे नॅपकिन्स दिले जात होते,
ज्यावर हिंदू देवी-देवतांची चित्रे आणि धार्मिक आरत्या छापलेल्या होत्या. यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
या घटनेची माहिती हिंदू संघटनांपर्यंत पोहोचताच त्यांचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमा झाले
आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हॉटेल चालकावर संताप व्यक्त केला.
या वेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि वातावरण तणावपूर्ण झाले.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हॉटेल चालकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली कारवाई करत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर घटना धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने स्थानीय प्रशासनाकडून प्रकरणाच्या
सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका,
नॅपकिन्स कुठून आले, यामागील हेतू जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू
असून हिंदू संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/five-varshanantar-kailas-mansarovar-yatrela-punha-suruvat/