अकोटच्या “योगारंभ” तर्फे 36 भाविकांची बस प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रवाना

अकोटच्या "योगारंभ" तर्फे 36 भाविकांची बस प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रवाना

अकोट – कॅप्टन डॉ. सुनिल डोबाळे यांच्या नेतृत्वाखाली “योगारंभ” संस्थेच्या वतीने

36 प्रवाशांची बस विधीवत पूजन करून प्रयागराज कुंभमेळ्यासाठी रवाना झाली.

भक्तिमय वातावरणात भाविकांचा सन्मान

प्रस्थानावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात प्रत्येक भाविकाला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

योगारंभचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुनिल डोबाळे यांना जिल्हा संघचालक मोहन

आसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कॅप्टन डोबाळे यांनी सपत्नीक बसचे विधीवत पूजन केले.

Related News

गणमान्य व्यक्तींची उपस्थिती

यावेळी श्री. दत्ता शास्त्री, जयप्रकाश पांडे, विजय जितकार तसेच शहरातील

मान्यवर, “योगारंभ”चे पदाधिकारी आणि स्वामी विवेकानंद शाखेचे योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाविकांना शुभेच्छा देऊन यात्रेला सुरुवात

कुंभमेळ्यात पवित्र स्नान व धार्मिक विधींसाठी या

यात्रेकरूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि यात्रेची मंगलमय सुरुवात झाली.

Read more news here : https://ajinkyabharat.com/neelam-gohchrya-allegation-shiv-sena-thackeray-gat-akil-akol-akol-akola-akola/

Related News