अकोटमध्ये ईद मिलादुन्नबी निमित्त भव्य शोभायात्रा; सामाजिक ऐक्याचा संदेश

ईद मीलाद जुलूस: धार्मिक उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव

अकोट – सोमवारी ईद मीलादुन्नबी  निमित्त शहरात भव्य (जुलूस) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच शहरभर उत्साहाचे वातावरण पसरले होते. डी जे, ढोल-ताशांच्या गजरात, नाऱ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

शोभायात्रेत विविध मशिदी, मदरशे आणि सामाजिक संघटनांचे मानकरी सहभागी झाले. आकर्षक सजावट केलेले ताबूत, झेंडे आणि उर्दू–हिंदी भाषेत लिहिलेल्या धार्मिक फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यात्रेदरम्यान धार्मिक व्याख्याने आणि पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील आदर्श व सदाचार यांचा संदेश दिला गेला. शहरभर “या नबी सलाम आलेका” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तामुळे शोभायात्रा शांततेत पार पडली. प्रमुख चौकांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या आणि नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले.

TR ग्रुपने चहा आणि अल्पोपार जुलूस दरम्यान येणाऱ्या नागरिकांना वाटप केले. अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील, शहर पोलिस निरीक्षक अमोल माळवे, ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे आदी अधिकाऱ्यांचा मुस्लिम समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सत्कार केला.

शोभायात्रा सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा आणि उत्साह यांचे उत्तम उदाहरण ठरली.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/tadkafdki-raazinama/