अकोटमध्ये युवा नेते अक्षय मनोहरराव घायल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सामाजिक भान जपत वाढदिवस साजरा; अक्षय घायल यांचा उपक्रम कौतुकास्पद

अकोटमध्ये युवा नेते अक्षय मनोहरराव घायल यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

अकोट:-  तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या शांतीवन अमृततीर्थ आकोली-आकोलखेड येथील श्री संत गजानन महाराज सजल विहीर

येथे युवा नेते  अक्षय मनोहरराव घायल यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मित्रमंडळी व शुभचिंतकांच्या उपस्थितीत गजानन महाराज प्रकट विहीर परिसरात वृक्षारोपण केले गेले. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाच्या

महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले आणि वृक्षारोपणासारख्या उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

या प्रसंगी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संस्थेची परिसर सजावट केली.

कार्यक्रमाच्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींनी अथक मेहनत घेतली.

Read also :https://ajinkyabharat.com/putinachaya-dishanamue-jailonskivar-kskapanastra-halla-tala-luxhanekocha-reveal/