उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन*
अकोट
अकोट येथील पोपटखेड रोड गजानन महाराज मंदिर विहीर रोड, हिवरखेड रोड,दर्यापूर रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बस स्टॅन्ड चौक,
अंजनगाव रोड व अकोट शहरातील विविध रस्त्यांची अक्षरशा चाळणी झालेली आहे या रोडवर रोज अपघात होत आहेत
तशेच दर गुरुवारी पोपटखेड रोडवर पायदळ वारी करणारे भक्तांना पायात चूरी घुसत आहे.
त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे या सर्व रस्त्याची निर्मिती जवळपास तीन महिने अगोदरच झाली परंतु निकृष्ट दर्जामुळे या रस्त्याची परिस्थिती अशी झालेली आहे .
त्यासाठी संबंधित कंत्राटदार यांच्या या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी .
अशे शिवसेनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी श्री लोणारकर व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी श्री सुल्ताने यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात ज्या जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व होत असलेला सामन्य जनेतला त्रास लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आलेली आहे.
सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईल ने आंदोलन छेडेल व झालेल्या नुकसानास प्रशासन जवाबदार असेल असा इशारा यावेळी देण्यात आले.
या निवेदनावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, जिल्हा समन्वयक श्याम गावंडे,तालुकाप्रमुख ब्रम्हा पांडे,शहरप्रमुख अमोल पालेकर,शहर प्रमुख ऍड मनोज खंडारे,
शहर संघटक सुनील रंदे, प्रणव चोरे, अक्षय घायल, विजय ढेपे, विजय जवंजाळ, श्रीकांत काम्बे,गणेश चंडालिया, आकाश बरेठिया, गोपाल कावरे,प्रथेमेश बोरोडे, सूचक भांबुरकर,
योगेश बरेठिया,भुरू भाई, अनिकेत सुरत्ने नयन तेलंगोटे आदीत्या लाहोरे कार्तिक सुरत्नेयांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.