अकोट : शहराल अकोला नाका ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात 6 नोव्हेंबर 2023 रोजी
वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळेस ब्रिजवर अंधार असल्याने अपघाताचे प्रमाण फार जास्त प्रमाणात वाढले होते.
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते दिपक रामदास बोडखे यांच्या मार्गदर्शनामध्ये अकोला
नाका ब्रिजवर विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आले होते.
रात्रीच्या वेळेस संपूर्ण ब्रिजवर अंधार पसरत असल्यामुळे अपघात वाढले होते.
या गंभीर बाबीकडे वंचित बहुजन आघाडीचे दिपक बोडखे,विशाल आग्रे व अक्षय
तेलगोटे यांनी ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
रात्रीच्या समयी रेल्वे ब्रिजवर पूर्णतः अंधार पसरल्यामुळे वाहनधारकांना
अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते.
यामध्ये गंभीर दुखापती सुद्धा अनेकांना झाल्या तसेच कित्येकांना आपला जीव गमावा लागला.
या प्रकारामुळे अकोट शहरात स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
वंचित बहुजन आघाडीचे नेते दिपक रामदास बोडखे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनात
6 नोव्हेंबर 2023 रोजी विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण घोषणास सुरुवात केली होती.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अकोट नगर परिषदेने उपोषणाची दखल घेत,
अकोट शहरातील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात मागणी मंजूर केली
व लेखी आश्वासन दिले. यावेळी दीपक बोडखे , नगरपालिका अधीक्षक सागर पहुरकर,
चिपडे,,ऋषिकेश तायडे, यांनी मागणी मंजूर करीत लेखी आश्वासन दिले.
नगरपालिकेने दिलेल्या आश्वासनानंतर 7 नोव्हेंबर 2023 रोजी आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषण संपल्यानंतरही विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीनंतर अकोट नगरपरिषदे द्वारा अकोला
नाका येथील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली.
लवकरच ब्रिज सहित अन्य ठिकाणी पथदिव्यांचा झगमगाठ पहावयास दिसणार आहे.
या सर्व प्रकारामुळे अकोट शहरातील नागरिकांमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-jilahyati-local-swarajya-sanstha-nivdnuk-reference-referenced-region/