अकोट रेल्वे स्टेशनवर युवकाचा दुर्दैवी मृत्यू – अपघात की आत्महत्या?

अकोट रेल्वे स्टेशनवर युवकाचा दुर्दैवी मृत्यू – अपघात की आत्महत्या?

अकोट रेल्वे स्टेशन परिसरात 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठच्या सुमारास

एका युवकाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा अपघात होता की आत्महत्या, याबाबत संभ्रम कायम आहे.

Related News

प्राथमिक माहितीनुसार, संजय तुकाराम ईखार (राहणार भवानीपुरा, हेवरखेड) असे

मृत युवकाचे नाव असून, त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून ओळख पटली आहे.

अकोट रेल्वे स्टेशनवर सायंकाळी आठच्या सुमारास नियोजित रेल्वे वेळापत्रकानुसार रेल्वे गेल्यानंतर ही घटना घडली.

युवक रेल्वेखाली कसा आला, याचा तपास सुरू असून रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रशासनाने याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

Read more news here : https://ajinkyabharat.com/fadnavisanmu-ghadya-aani-dhanushyabanala-matan-suresh-dhasanchaya-davayane-mahayatitam-differences/

Related News