अकोट शहरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
केवळ “मुलाकडे आई अधिक लक्ष देते” या कारणावरून एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा निर्दय खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ही घटना २ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कवठा येथे घडली.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
वैयक्तिक दु:खातून क्रौर्यापर्यंतचा प्रवास
मुक्ता उर्फ लक्ष्मी शिराळकर या महिलेचा पहिला पती वैभव पळसकर याने आत्महत्या केल्यानंतर ती आपल्या दोन मुलांसह मायच्या घरी परतली होती.
अकोटमधील मॉलमध्ये काम करत तिने संसार सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, तिची ओळख आकाश कान्हेकर या युवकाशी झाली आणि ६ महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला.
मात्र, संसार काही टिकला नाही. सततच्या वादांना कारण ठरले दर्शन – तिचा ९ वर्षांचा मुलगा.
निर्दयी हत्येची थरकाप उडवणारी पद्धत
२ जुलै रोजी मुक्ता कामावर गेल्यानंतर आकाशने आपल्या मित्र गौरव गायगोले याला घेऊन दर्शनला दुचाकीवरून जंगलात नेलं.
तिथे त्याचे हातपाय तोडून, पोत्यात भरून मृतदेह फेकून दिला.
दर्शन घरी न परतल्याने मुक्ताने पोलीस ठाण्यात तक्रार केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल
यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आकाश आणि गौरवला अटक करण्यात आली.
मृतकाची आजी सुनंदा शिराळकर म्हणाल्या:
“दर्शन अत्यंत शांत, निरागस मुलगा होता. आईला मदत करायचा. असं काही होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं…”
अनमोल मित्तल, SDPO अकोट म्हणाले:
“आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. पुरावे जमा करण्यात आले असून गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
संतप्त अकोटकरांचा निषेध
या घटनेनंतर अकोटमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला.
आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात शिक्षा व्हावी, मृतक कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
एक आईचा संघर्ष, एक मुलाचा जीव, आणि विकृत रागातून झालेली एक क्रूर हत्या…
संपूर्ण अकोट हादरलंय – आता संपूर्ण लक्ष आहे की, दोषींना किती कठोर शिक्षा होते!
Read Also : https://ajinkyabharat.com/kapashi-rastyavariil-incomplete-service-road/