अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना जाहीर करण्यात आली आहे.
यामुळे वर्षानुवर्षे थकीत असलेल्या मालमत्ता कर वसुलीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या १५ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली.
त्यानंतर ३० एप्रिल रोजी राज्यपालांनी नगर परिषद कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश जारी केला.
१९ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार थकीत करधारकांना शास्तीमाफीची संधी देण्यात आली आहे.
योजना कशी कार्यान्वित होईल?
-
ज्या मालमत्तांवर शासन निर्णयाच्या तारखेपर्यंत कर थकित आहे, त्या प्रकरणांमध्ये शास्ती
माफीचा प्रस्ताव संबंधित नगरपालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करेल.
-
५०% पर्यंतची शास्ती माफ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील.
-
५०% पेक्षा अधिक शास्ती माफ करायची असल्यास प्रस्ताव आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांचेकडे पाठवावा लागेल.
-
अंतिम निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल.
करदात्यांसाठी सुवर्णसंधी
या योजनेमुळे मालमत्ताधारकांना थकीत कर भरणं सुलभ होणार आहे.
शास्तीमध्ये मिळालेली सवलत ही वसुलीस चालना देणार असून,
अनेक वर्षांपासून थकलेले महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोट नगर परिषदेचा आवाहन
डॉ. नरेंद्र बेंबरे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, अकोट नगर परिषद यांनी सांगितले की,
“अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता धारकांनी कर विभागाशी संपर्क साधावा.
कराची मूळ रक्कम व ५०% शास्ती त्वरित भरून, उर्वरित ५०% शास्ती माफ करण्यासाठी अर्ज सादर करावा.”
या निर्णयामुळे पालीकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार असून, नागरिकांनाही दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/new-accumulation/