अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा

अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा

अकोट

अकोट तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व श्री.संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्यूस कंपनी जळगाव नहाटे

या संस्थांची हमी भावा अंतर्गत शासकिय ज्वारी खरेदी करण्यासाठी सब एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Related News

खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी करणे,दस्तऐवजांची सत्यता तपासणी करणे,गुणवत्ता पुर्ण धान्याची खरेदी करणे ही जबाबदारी सब एजंट यांची होती.

परंतु सब एजंट यांना अकोट येथील काही संगणक चालक,सेतू चालक,यांच्या सहाय्याने शेतीचे खोटे ७/१२ इत्यादी

शासकीय दस्तऐवज तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची शक्यता आहे.

ज्या व्यक्तीने ज्वारीची पेरणी केलीच नाही त्यांच्या नावावर खुल्या बाजारात खाजगी व्यापाऱ्यानी कमी दरात घेतलेली ज्वारी हमी भावांमध्ये विक्री केल्याचे दाखवून शासकीय निधीचा

मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे.अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे केल्या होत्या.

सदर तक्रारीची वंचित बहुजन आघाडीने ताबडतोब दखल घेऊन सदर प्रकरणात सखोल चौकशी करून भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.

चौकशी मध्ये ज्वारी खरेदी ज्या सातबारा दस्ताऐवजांच्या आधारावर करण्यात आली त्या दस्तऐवजांची आँनलाईन दस्तएवजाची पडताळणी करावी.

तसेच बाजार समिती मध्ये खरेदी करण्यात आलेली ज्वारी व्याऱ्यांनी कुठे विक्री केली,कुठे साठवणूक केली याची तपासणी करण्यात यावी.

ज्या व्यक्तींच्या नावावर ज्वारी खरेदी करण्यात आली त्यांनी पिक विमा कोणत्या पिकासाठी घेतला याची तपासणी करण्यात यावी.

इत्यादी मागण्यासह वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी यांना

निवेदन देऊन दोषी आढळणाऱ्या वर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

यासह अकोला जिल्ह्यात इतर तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ ज्वारी खरेदीची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी.

ही मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे माजी जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ,निखिल गावंडे,गजानन गवई,मनोहर शेळके,

गोरसिंग राठोड,प्रभाताई शिरसाट,वसंतराव नागे,पवन बुटे,किशोर जामनिक,नितीन सपकाळ,पराग गवई,संजय बूध,

प्रदीप शिरसाट,प्रदीप चोरे,सुयोग आठवले,चेतन कडू,शुद्धोधन इंगळे,

गोपाल ढोरे,मोहन दाते,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Also :  https://ajinkyabharat.com/rural-bhagati-pandan-rastyachi-status-bikat/

Related News