अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
Related News
अकोल्यात विवाहसोहळ्यात ‘गौसेवे’चा अनोखा उपक्रम :
अकोट फैलमध्ये गटाराचे पाणी घरात;
बार्शीटाकळीतील मांगुळमध्ये अवकाळी पावसाचा कहर :
पातुरमध्ये गोवंश तस्करी उघडकीस :
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
अकोट शहर पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.
ही मॉक ड्रिल ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता अकोट शहरातील बीएसएनएल कार्यालयात राबविण्यात आली.
डमी माहितीच्या अनुषंगाने बीएसएनएल कार्यालयावर कथित आतंकवादी हल्ला झाल्याची माहिती प्रसारित करण्यात आली.
हल्लेखोरांनी दोन कर्मचाऱ्यांना बंदिवान बनवल्याचे चित्रण या मॉक ड्रिलमध्ये करण्यात आले.
शहरात तात्काळ नाकाबंदी, वाहतूक नियंत्रण
ही माहिती मिळताच अकोट शहरातील मुख्य ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली,
तसेच शहराच्या बाहेर जाणारी वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली.
संपूर्ण ड्रिल अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
सुरक्षा यंत्रणांचा संयुक्त सहभाग
या मॉक ड्रिलमध्ये खालील प्रमुख यंत्रणांचा सहभाग होता:
-
अग्नीशमन दल
-
अॅम्बुलन्स सेवा
-
बॉम्ब शोधक व नाशक पथक
-
फॉरेन्सिक टीम
-
एटीएस (Anti-Terrorism Squad)
-
एटीबी, क्युआरटी, आरसीपी पथक
-
इन्व्हेस्टीगेशन कार
-
अकोट शहर, अकोट ग्रामीण, हिवरखेड पोलीस
पोलीस यंत्रणा सज्ज – अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
या मॉक ड्रिलद्वारे अकोला जिल्हा पोलीस कोणतीही आपत्कालीन व गंभीर
परिस्थिती हाताळण्यास सज्ज असल्याचा विश्वास नागरिकांना दिला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सहकार्य राखावे,
असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदर मॉक ड्रिल ही मा. पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस
अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.