अकोला शहरातील जेल चौक ते रेल्वे स्टेशन रोडवरील उड्डाणपुलावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अशोक वाटिकेकडून टॉवर चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. जखमींमध्ये राज तायडे, गौरव वानखडे, भारत तायडे यांचा समावेश आहे, तर गंभीर जखमीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
अकोल्यातील उड्डाणपुलावर दुचाकी अपघात; एक गंभीर, तिघे जखमी

05
Aug