अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’

अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’

अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.

त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांपैकी ‘बीसीसीआय लेव्हल २ पंच पॅनेल’मध्ये पवन हलवणे यांचे नाव देशातून अव्वल क्रमांकावर आहे.

खेळाप्रती प्रेम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी या गुणांच्या बळावर शेतकऱ्याच्या मुलाने क्रिकेट पंचाची परीक्षा उत्तीर्ण केली.

Related News

त्यांची ‘बीसीसीआय नॅशनल अंपायर पॅनल’वर निवड झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील सांगवी बाजार येथील प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण महादेव हलवणे यांचे चिरंजीव पवन यांनी ‘बीसीसीआय’तर्फे घेण्यात

आलेल्या ‘अम्पायर २०२५’ फायनल परिक्षेत देशातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.

वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

पंच होण्याकरिता अकोला क्रिकेट क्लब येथे प्राथमिक धडे घेतले.

अकोल्यातील एका हायस्कूलमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून नोकरीदेखील केली.

त्यांच्या या निवडीने पवन हलवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/dhonda-last/

Related News