मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणी कोठडी मृत्यू प्रकरणाचा अकोल्यात जनआक्रोश मोर्चा

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या आणि परभणी कोठडी मृत्यू प्रकरणाचा अकोल्यात जनआक्रोश मोर्चा

अकोला: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या

कोठडीतील मृत्यूच्या निषेधार्थ अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

मोर्चात सहभागी लोकांनी काळ्या फिती लावून आणि काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. या दरम्यान,

Related News

दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच मंत्री धनंजय मुंडे

यांचा राजीनामा घेण्याचे आणि फरार आरोपींना तातडीने अटक करण्याचे आवाहन करण्यात आले.

मोर्चा अशोक वाटिका येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

आर्थिक मदतीची घोषणा:

आयोजकांकडून देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली.

या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.

या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून सरकारला

आणि प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/nitish-and-chakraborty-in-jurel-bishnoi-waiting-for-the-first-t20-suryacha-sens-11-will-be-a-rocky-corner/

Related News