अकोला :लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असताना अकोल्यात एक अभिमानास्पद विक्रम घडला आहे.
धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर
शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विक्रमी उपस्थितीमुळे या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे.
या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अशा पर्यावरणपूरक कार्यशाळा अधिकाधिक प्रमाणात आयोजित करण्याचे आवाहन केले.
पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत होता.
मात्र या उपक्रमातून शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यावरणपूरक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे समाधान व्यक्त केले.
शाडू मातीच्या गणपतीमुळे पर्यावरणाला नवा श्वास मिळत असून अकोल्यातील हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/power-aali-gali-pan-ndni-kadhi-udi-marli-naahi-jayant-patil/