अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!

अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव;

पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत

सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून

दोन वेळा सूर्य नेमक्या डोक्यावर येण्याचा अनुभव मिळतो. त्यावेळी सावली थेट पायाखाली

Related News

पडते आणि काही क्षणांसाठी अदृश्य होते – हा अनुभवच ओळखला जातो ‘शून्य सावली दिवस’ या नावाने.

आज अकोल्यात असाच एक अनोखा अनुभव नागरिकांनी घेतला.

सकाळी ११:५५ वाजल्यापासून पुढील १० मिनिटं, अकोल्यातील प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीची सावली जणू गायब झाली होती.

झाडं, इमारती, माणसं – कोणाच्याच सावल्या दिसल्या नाहीत.

हा अविश्वसनीय पण वैज्ञानिकदृष्ट्या समजावून घेता येणारा अनुभव पाहण्यासाठी अनेकजण बाहेर पडले होते.

शहरातील काही शाळांमध्ये यासाठी विशेष निरीक्षणाचे सत्र आयोजित करण्यात आले होते.

विद्यार्थी, शिक्षक, आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत याचा साक्षात्कार घेतला.

अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले. काहींनी पहिल्यांदाच असा अनुभव घेतल्याने उत्साह द्विगुणीत झाला.

शून्य सावली दिवस हा एक केवळ खगोलीय घटना नसून, तो विज्ञान, सृष्टी आणि आपल्या

स्थानिक भौगोलिक स्थितीबद्दलची जाणीव करून देणारा एक सुंदर क्षण ठरतो.

आजचा दिवस अकोल्यासाठी केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नव्हे, तर एक स्मरणीय पर्वणी ठरला!

Read Also : https://ajinkyabharat.com/2025-in-26th/

Related News