अकोला | १४ मे २०२५
अकोल्यातील भगतसिंग चौक, माळीपुरा परिसरात राहणाऱ्या रोहित धर्मराज संदलकर
(वय ३५) यांचा मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान,
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
रोहित अग्रसेन चौकातून आपल्या घरी जात असताना जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, गतिरोधकाजवळ पाणी साचल्यामुळे रोहित यांना पाण्याची खोली
समजली नाही आणि सायकल घसरून ते पडले. यामध्ये डोक्याला जबर मार
लागल्यामुळे घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात की नैसर्गिक आपत्ती,
याचा तपास सध्या रामदास पेठ पोलीस करत आहेत.
रोहित हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या पश्चात आई कमलाबाई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
कमलाबाई संदलकर, मृतकाची आई म्हणाल्या –
“माझा मुलगा पावसामुळे घसरून गेला, सरकारने मदत केली पाहिजे.
आम्ही गरीब लोक आहोत, आमच्यावर आभाळ कोसळलं आहे.
रोहित गेल्यानंतर आम्हाला कोण पाहणार?”
कुटुंबीयांनी शासनाकडे नैसर्गिक आपत्ती म्हणून मदतीची मागणी केली आहे.
तसेच या घटनेची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, अशी विनंतीही केली गेली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-kisan-yojana-2025-20th-haptay-poori-o-3-kama-nakki/