अकोला (प्रतिनिधी) – लग्नसमारंभ म्हटले की विविध आकर्षक कार्यक्रम,
आधुनिक ट्रेंड्स हे सामान्य झाले असताना अकोल्यात एका विवाहसोहळ्याने सामाजिक व धार्मिक
जाणीवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. १७ मे रोजी रिंग रोडवरील आसरा
Related News
ज्योती मल्होत्रा ची खरी ओळख काय?
अकोट फैलमध्ये गटाराचे पाणी घरात;
बार्शीटाकळीतील मांगुळमध्ये अवकाळी पावसाचा कहर :
पातुरमध्ये गोवंश तस्करी उघडकीस :
“भारताच्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत”
“भारताविरुद्ध कट रचणाऱ्या अल्पवयीनाची गुजरातमधून अटक;
“मला 2 कोटी मागितले अन् वैष्णवीचा जीव गेला!”
भारतात पुन्हा कोरोनाचा फैलाव,
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ!
पाकिस्तानसाठी काम करत होते, ज्योती मल्होत्राची मोठी कबुली;
कोकणात मुसळधार पावसाचा कहर!
केदारनाथ ते देहरादूनपर्यंत पावसाचा इशारा!
कॉलनी क्र. १ येथील रहिवासी अंकित श्यामसुंदर शर्मा व नेहा कुंदन शर्मा (सुरत)
यांच्या विवाह सोहळ्यात ‘गौसेवे’साठी गाय दानपेटी ठेवण्यात आली होती.
संगीत संध्याकाळी पार पडलेल्या या अभिनव संकल्पनेतून १३ हजार ६५० रुपयांचे दान संकलित झाले.
हरिप्रिया गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीशजी उटांगळे यांच्या हस्ते दानपेटीचा शुभारंभ करण्यात आला.
वऱ्हाड आणि पाहुण्यांनी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला.
या उपक्रमामागे अॅड. एम.बी. शर्मा यांची संकल्पना होती. त्यांच्या कुटुंबीयांनी समाजापुढे एक
सकारात्मक संदेश देत विवाहासारख्या शुभ प्रसंगी धर्म आणि समाजहित जपण्याचे उदाहरण घालून दिले आहे.
अंकित शर्मा सध्या एसबीआय आरबीओ, बुलढाणा येथे कार्यरत आहेत.
त्यांच्या आजोबांचा वारसा आणि संस्कार यांचा प्रभाव त्यांच्या विचारसरणीत स्पष्ट दिसतो.
“गाय ही आपली माता आहे, तिची सेवा म्हणजेच सच्चे पुण्य,”
असं आयोजकांनी सांगितलं. आता हा उपक्रम इतर विवाह समारंभांतही राबवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
‘जय गाई माता’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं.
धार्मिकतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या अशा विवाह उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-falamadhyay-gatarache-pani-gharat/