अकोलाच्या रेल्वे स्थानकावर दोन तरुणांत तुफान फ्री स्टाईल हाणामारी

अकोलाच्या रेल्वे स्थानकावर दोन तरुणांत तुफान फ्री स्टाईल हाणामारी

अकोलाच्या रेल्वे स्थानकावर दोन तरुणांमध्ये जोरदार फ्रीस्टाइल हाणामारी झाली.

अजिंक्य भारत न्यूज ‘च्या कॅमेरात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

एका तरुणाने दुसऱ्याकडे पैसे मागितल्याने वाद सुरू झाला.

दुसऱ्याने विरोध करताच वाद विकोपाला गेला आणि दोघे एकमेकांना बेदम मारहाण करू लागले.

यावेळी एका तरुणाने चक्क कचऱ्याची बोरी उचलून दुसऱ्याच्या डोक्यात घातली.

परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.

शेवटी उपस्थितांनी भांडणाऱ्या एका तरुणाला चोप देत भांडण थांबवले.

यामुळे स्टेशनवर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Read Also : https://ajinkyabharat.com/kapil-sharmachya-candy-yethil-coffee-punha-golibar/