अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद

अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद

अकोला, दि. १० (प्रतिनिधी):

अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी

रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती.

Related News

पीडित मुलीच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी रामदास पेठ पोलीस ठाण्याने विशेष पथक गठीत केले.

सदर पथकाने सततच्या प्रयत्नांनंतर आरोपीचा माग काढत त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

“पीडित मुलीच्या तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल करून आम्ही आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं होतं.

आज आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.”

— मनोज बहुरे, पोलीस निरीक्षक, रामदास पेठ पोलीस स्टेशन, अकोला

Related News