अकोला पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीला गेलेले 200 मोबाईल मूळ मालकांना परत

अकोला पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीला गेलेले 200 मोबाईल मूळ मालकांना परत

अकोला पोलिसांनी विशेष मोहिम राबवून 2024 ते 2025 या कालावधीत चोरीला गेलेले 200 हून अधिक मोबाईल

मूळ मालकांना परत करण्यास यश मिळवले आहे. या मोबाईलची एकूण किंमत 42 लाख रुपये असून,

गर्दीच्या ठिकाणी आणि घरातून चोरीला गेलेले हे फोन शोधून पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे.

Related News

विशेष मोहिमेद्वारे पोलिसांनी चोरीच्या मोबाईलची माहिती गोळा करून संबंधित व्यक्तींचा शोध घेतला.

याअंतर्गत आणखी काही मोबाईल जप्त करण्यात आले असून, चोरट्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून,

पोलिसांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

चोरीच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी पोलिसांचा विशेष भर असणार आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/shashanachaya-youth-award-received-shetkyancha-tokachan-paul-agriculture-minister-kokate-mahanale-j-koni-officer/

Related News