अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला महापालिकेचा 10.92 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

अकोला: अकोला महानगरपालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा ₹10.92 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प

प्रशासक तथा आयुक्त लहाने यांनी आज सादर केला. ₹1456.83 कोटींच्या अपेक्षित

उत्पन्नाच्या तुलनेत ₹1445.91 कोटी खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Related News

विशेष बाब म्हणजे, नवीन कर वाढ नसल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.

तसेच, शहरात इ-बस सेवा सुरू करण्यासाठी खडकी झोन येथे बस स्टेशनसाठी

₹10 कोटी आणि चार्जिंग पॉइंटसाठी ₹2.5 कोटींच्या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाचे आर्थिक प्रवाह:

🔹 महसूल खर्च: ₹322.69 कोटी
🔹 भांडवली खर्च: ₹935.80 कोटी
🔹 असाधारण ऋण व निलंबन लेखे: ₹187.42 कोटी

महापालिकेने हद्दवाढ भागातील विकासकामांसाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेला आणखी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत,

असे प्रशासक लहाने यांनी स्पष्ट केले.

Related News