अकोला: “प्रवाशांच्या सुरक्षेसाठी” हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
(एसटी) अकोला विभागाच्या अखत्यारीत असलेल्या अकोला शहरातील जुन्या बसस्थानकाची सुरक्षा धोक्यात आहे.
सीसीटीव्ही आणि पोलिसांचा अभाव
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर,
Related News
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट:
“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;
अकोला शहरातील जुन्या बसस्थानकात सुरक्षेची अत्यंत दयनीय परिस्थिती असल्याचे समोर आले आहे.
येथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच पोलीस कर्मचारीही तैनात नाहीत. एवढेच नाही,
तर आवाराभोवती भिंतही नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.
दररोज शेकडो प्रवासी धोक्यात
अकोला आगार क्रमांक १ अर्थात जुने बसस्थानक मुख्यतः ग्रामीण भागातील आणि लांब पल्ल्याच्या बसेसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.
येथून छिंदवाडा, निजामाबाद, अदिलाबाद, इंदूर, नागपूर आणि नांदेड या ठिकाणी बससेवा आहे.
- आगारात ३८ बस असून, दररोज २२५ फेऱ्या घेतल्या जातात.
- प्रवाशांची रात्रभर वर्दळ असते, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना नाही.
- फक्त चार खासगी सुरक्षा रक्षक येथे तैनात असून, पोलिस चौकी किंवा पोलीस कर्मचारी यांचा मागमूसही नाही.
प्रशासनाला सतर्कतेची गरज
जुने बसस्थानक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असूनही सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही.
स्थानिक प्रशासनाने आणि एसटी महामंडळाने लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिस सुरक्षा तैनात करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rural-bhagatun-high-shikshaanasathi-alelya-vidyarthayachi-suicide/