अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला

अकोला: जुना शहर पोळा चौकात युवकावर जीवघेणा हल्ला

अकोला, प्रतिनिधी |

अकोला शहरातील जुना शहर परिसरातील पोळा चौकात आपसी वादातून एका युवकावर चाकूने

जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Related News

शेख नाजिम शेख खालिक (रा. सोनटके प्लॉट) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून,

त्यांच्यावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चहा प्यायला बोलावून चाकूने वार

ही घटना २ मे रोजी रात्री साधारणतः २ वाजण्याच्या सुमारास घडली. शेख नाजिम यांचा आरोप आहे की,

ते मागील ४ महिन्यांपासून आपल्या दोन भावांपासून आणि वहिनीपासून वेगळं राहत होते.

त्याच काळात त्यांना चहा प्यायचा बहाणा करून घरी बोलावण्यात आलं.

घरात पोहोचताच त्यांच्या दोन भावांनी आणि वहिनीने एकत्रितपणे त्यांच्यावर चाकूने अचानक हल्ला केला,

असा आरोप शेख नाजिम यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या छातीत व पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून,

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर जूना शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात भावकी वाद आणि कौटुंबिक तणाव या पार्श्वभूमीवर हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akola-naveen-udanpulavar-duchaki/

Related News