अकोल्याच्या रामदास पेठ पोलीस हद्दीत राजस्थानी आईस्क्रीम गाडीवर
काम करणाऱ्या मजुराची ठेकेदाराकडून पिळवणूक होत होती.
यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली, मात्र पोलीस ठाण्यात तक्रार न करता ठेकेदाराला
सहानुभूतीपूर्वक मजुराची थकित रक्कम परत करण्याची मागणी केली.
यावेळी ठेकेदाराने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकलं आणि म.न.से.च्या मदतीने मजुराला त्याची मजुरी व
कागदपत्रे मिळवून देत राजस्थानला रवाना करण्यात आले.
परप्रांतीयांना मारहाण न करता त्यांच्यात समेट घालून न्याय दिला गेला.
संबंधित मजुराने मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. म.न.से.बद्दल
परप्रांतीयविरोधी असल्याची बदनामी अनेकदा केली जाते, पण या प्रकरणात माणुसकीचं दर्शन घडवलं गेलय.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasacha-jor-vadhanar/