अकोला: विद्युततार चोरी उघडकीस, ५ आरोपींना अटक; बोलेरो पिकअपसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला: विद्युततार चोरी उघडकीस, ५ आरोपींना अटक; बोलेरो पिकअपसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

उरळ पोलीस ठाण्यात दाखल विद्युततार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा,

अकोला यांनी मोठे यश मिळवले आहे. फिर्यादी एम. के. खोहे यांच्या तक्रारीवरून सुरू

झालेल्या तपासात पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Related News

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

मंगेश सुभाष जाधव

विजयनाय मणीराम रोशन

बाबुलाल राठोड

दिपक मनोहर पवार

या आरोपींनी मिळून एकूण ४ वेगवेगळ्या ठिकाणी विद्युततार चोरी केल्याची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे, आरोपी मंगेश सुभाष जाधव याचे बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. १२ क्यू. डब्ल्यू. २५०२) चोरीच्या घटनेत वापरण्यात आले होते,

अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर वाहन ७ लाख रुपये किमतीचे असून ते जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून ही कारवाई उघडकीस आणली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/takki-yehe-ahethe-asvalacha-rangist-halla-shetkari-son-jakhmi-maji-sainikrawahi-halla-campus-environment/

Related News