अकोला पुर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेस चा दावा!!

काँग्रेस चे राज्य प्रवक्ते कपिल ढोके ह्यांनी घेतला पक्षाकडुन अर्ज.. 

युवकांचा प्रतिनीधी म्हणुन निवडणुक लढवण्यास इच्छुक.

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना

Related News

उमेदवारी मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

विविध पक्षांकडुन इच्छुकांचे अर्ज मागवले जात आहेत.

अशातंच महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते

व युवक कॅांग्रेस चे महासचिव कपिल ढोके ह्यांनी

अकोला पुर्व विधानसभा मतदार संघातुन

निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.

स्थानिक कॅांग्रेस पक्ष कार्यालयातुन त्यांनी इच्छुक उमेदवाराचा

अर्ज घेतला आहे.

अकोला पुर्व हा मतदार संघ गेल्या अनेक निवडणुकांमध्ये

कॅांग्रेस कडेच राहीला आहे.

ह्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडी च्या

समिकरणामुळे हा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाला

जाऊ शकतो अशी जिल्ह्यात चर्चा असतांना

कॅांग्रेस मधून कपिल ढोके ह्यांच्या सारख्या युवा नेतृत्वाने

निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.

अकोला पुर्व मतदार संघात येणाऱ्या कुटासा ह्या गावातील

कपिल ढोके हे सामान्य शेतकरी कुटुंबातील असून

राजकारणात सक्रिय आहेत.

युवकांच्या अनेक प्रश्नांवर ते सातत्याने काम करत असतात.

प्रदेश कॅांग्रेस कमिटीचे प्रवक्ते म्हणुन माध्यमांवर पक्षाची भुमिका

ते मांडत असतात.

अकोला पुर्व ह्या शहरी व ग्रामिण अशी रचना असलेल्या

मतदार संघामध्ये कपिल ढोके ह्यांना कॅांग्रेस पक्षाने

उमेदवारी दिल्यास एक युवा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असेल

सोबतंच महाविकास आघाडी मध्ये कॅांग्रेस कि शिवसेना

हा उमेदवारी मिळेपर्यंतचा सामना सुद्धा

आगामी काळात बघायला मिळेल.

Read also: https://ajinkyabharat.com/vinay-mohan-kwatra-appointed-as-indias-ambassador-to-america/

Related News