अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद

अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद

अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराच्या वादात रंगली. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या

अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन

Related News

देशमुख यांच्यात दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून वाद झाल्याची माहिती आहे.

या दरम्यान दोघांमध्ये चांगलीच घमासान झाल्याची चर्चा आहे. ही बातमी बाहेर पसरताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते

आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले होते.

यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार घडला. यावेळी दोन्ही

कार्यकर्त्याकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद निवळला.

दरम्यान याबैठकीत कुठलाच वाद झाला नसल्याचे दोन्ही आमदारांचे म्हणणे. यावेळी एकमेकांच्या

अंगावर किंवा शिवीगाळ झाली नसल्याचं दोन्ही आमदारांचे म्हणणे आहे.

विकासाच्या मुद्द्यावर खडाजंगी झालीय. तर पालकमंत्री आकाश फुंडकर यांनीही विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं म्हटलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/illegal-secondary-minerals-royalty/

Related News