पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला.
Akola Crime : बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचा हकनाक बळी गेला.
पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्याला जबर मारलं.
नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. त्याचा चेहरा दगडाने ठेचला. जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारहाण केली.
Related News
माय ममता झाली काळी!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा समरी अहवाल उघड!
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे.
अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म चारवर रेल्वेतून एक दाम्पत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला.
(‘NDTV मराठी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महिलेच्या नवऱ्यानं मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटरपर्यंत पाठलाग सुरुच होता.
अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा. मात्र, या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली.
हेमंत गावंडे असं या पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचं नाव. उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची वाढ केली असून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या बायकोने सांगितला आहे.
मंगळसूत्र न्यायचं होतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला आहे.