अकोल्यात महिला चोर पकडली….

अकोल्यात महिला चोर पकडली....

अकोला: अकोला शहरातील नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने

चोरणाऱ्या सराईत चोर महिलेला  सिव्हिल लाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

अकोला ते पातूर बसमार्गावर एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील साडे तीन ग्रॅम सोन्याची पोत चोरी केल्यानंतर

Related News

या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी मोठा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आणला.

पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत कीर्ती रोहित गायकवाड

 या चोर महिलेला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिसांनी

तिचा कसून तपास घेतला असता तिने एकूण १० चोरींची कबुली दिली. हे ऐकून पोलिसही काही क्षणांसाठी चक्रावून गेले.

 गुन्ह्यांचा आढावा:

  • आरोपीकडून ३ लाख ९ हजार १३८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त

  • एकूण ८० ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत

  • विविध ठिकाणी प्रवासी महिलांचे दागिने चोरण्याचे प्रकार उघड

या कारवाईदरम्यान महिला आरोपीकडून जप्त करण्यात आलेले सोनं आणि कबूल केलेले गुन्हे पाहता,

पोलिसांच्या विशेष पथकाच्या दक्षतेचे कौतुक होत आहे. पोलिसांकडून या महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-term-temperature-prachanda-vad/

Related News