अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:

अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:

बच्चन सिंग यांची नागपूर कमांडर म्हणून बदली; आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल

अकोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यभरातील पोलीस अधीक्षकांच्या

बदल्या जाहीर करण्यात आल्या असून, या बदल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातही महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

Related News

अकोल्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली करून त्यांची

नियुक्ती नागपूरच्या पोलीस दल गट क्रमांक ४ चे कमांडर म्हणून करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी नागपूर येथे पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची

अकोला जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पोलीस

व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे प्रशासनिक दृष्टिकोन, कार्यक्षमता आणि कायदा-सुव्यवस्थेवरील

दृढ नियंत्रणासाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील कायदा व सुव्यवस्था

अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-musadhar-pavasacha-kahr/

Related News