“अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे…

"अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे...

अकोल्याच्या पातुर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात वडील आणि मुलगा

गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे.”

“घटनास्थळ आहे – पातुर रोडवरील अमनदीप हॉटेल समोरचं ठिकाण,

Related News

जिथं आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पातुरकडून

भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली.”

“या अपघातात बार्शीटाकळी शहरातील माळीपुरा परिसरातील वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेनंतर लगेच उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली आणि दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं.”

“मात्र जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी

खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेचा तपास जुने शहर पोलीस करत असून, आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू आहे.”

“अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून पोलिसांकडून तपासाला गती देण्यात येत आहे.”

Read Also :   https://ajinkyabharat.com/jangi-tanavachaya-parshvabhmivar-sonam-khedi-karavam-vikavan/

Related News