अखेर खासदार निलेश लंकेंचे उपोषण चौथ्या दिवशी मागे!

बाळासाहेब

बाळासाहेब थोरातांची मध्यस्थी यशस्वी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके

गेल्या चार दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या विरोधात अहमदनगर येथील

Related News

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला  बसले होते.

अखेर आज त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीला यश आले आहे.

खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून

स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते.

स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळ्या असून

दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेच्या

पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकांकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई

असल्याचा आरोप लंके यांनी पत्रात केला होता.

हप्ते गोळा करणार्‍यांवर पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निलेश लंके यांनी केली होती.

पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने खासदार निलेश लंके

व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते.

गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरु होते.

या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या उपोषणस्थळी भेट दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी निलेश लंके यांना

पोलीस विभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची 15 दिवसात चौकशी होणार,

असे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आणि बाळासाहेब थोरात

यांच्या मध्यस्थीनंतर निलेश लंके यांनी बाळासाहेब थोरातांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडले.

Read also: https://ajinkyabharat.com/mumbai-pune-mumbai-railway-traffic-closed-due-to-rain/

Related News