अजित पवारांनी दिली आगीत नुकसान झालेल्या कोल्हापूर नाट्यगृहाला भेट

पुनर्बांधणीसाठी 20 कोटींची घोषणा!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील केशवराव भोसले

नाट्यगृहाला भेट दिली. 8 ऑगस्टच्या रात्री या नाट्यगृहाला

Related News

आग लागली होती. रविवारी अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ

आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये अजित पवार यांनी म्हटलं आहे की,

‘कोल्हापूरचे थोर कलावंत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच

‘केशवराव भोसले नाट्यगृहाला’ लागलेली भीषण आग ही कोल्हापूरकरांसाठी

आणि समस्त कलाकारांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. हसन मुश्रीफजी, इतर पदाधिकारी

व माझे सहकारी यांच्यासह आज मी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली.

मी कोल्हापूरकरांना सांगू इच्छितो, हे नुकसान लवकरात लवकर भरून काढून

ही वास्तू त्याच दिमाखात आणि डौलाने उभी करण्यासाठी माझ्या परीने

सर्व प्रयत्न मी करेन.’ असे म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/dhanushs-support-to-wayanad-landslide-victims/

Related News