Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘पीक कर्जमाफी होणार…’

Ajit Pawar: पीक कर्जमाफी होणार की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'पीक कर्जमाफी होणार...'

Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी

पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

बारामती: राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती

Related News

सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पीकासाठी कर्ज दिलं जातं.

यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते.

फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. मात्र, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची

कर्जमाफी करू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं.

त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकार कर्जमाफी करेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास आखडता हात घेतला आहे.

दरम्यान  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार (Ajit Pawar)

यांनी पिककर्ज माफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता,

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या.

आर्थिक शिस्त गरजेची असते. त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला. विरोधकांनी जी टीका करायची ती केली.

आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला.

मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे.

सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते.

मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा.

जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही.आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील

परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ. या वर्षी आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही,

तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे.

सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा

पुढे  पुतळ्याच्या अनावरणाबाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,

सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे.

त्या शिकवणी मधून आपण पुढे जात आहोत. 1984 साली या पुतळ्याच्या अनावरासाठी राष्ट्रपती,

त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते.

काही महिन्यांपुर्वी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झालं.

त्याला मी होतो, देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे होते त्यामध्ये काही चुका झाल्या

आणि वाऱ्याच्या वेगाने नको ती घटना घडली. त्याचे शल्य सगळ्यांना आहे.

समुद्राची हवा लोखंडाला बाद करून टाकते त्यामुळे तो प्रकार घडला.

आता पुन्हा एकदा आम्ही त्याचं काम सुरू केले आहे. ते अंतिम टप्प्यात आहे,

स्टेनलेस स्टील हे मटेरियल तिथे वापरलं. छत्रपती शिवाजी, महाराज संभाजी महाराज आपले दैवत आहेत.

त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे, जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, ती खबरदारी आपण घेतली.

त्यामुळेच आज माळेगाव येथे पुतळ्याचं अनावरण केलं. निजामाचे राज्य होतं,

आदिलशाहीचं राज्य होतं, पेशव्यांचे राज्य होतं, परंतु शिवाजी महाराजांचा आडनाव भोसले होते

त्यांचे राज्य कधी नव्हतं ते रयतेचे राज्य असे म्हणायचे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.

अजितदादांनी थेट संचालकांना ढकललं मागं अन्…

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.

यावेळी कोनशिलेजवळ संचालकांनी मोठी गर्दी केली होती.

कोनशिलेजवळ फोटो काढत असताना संचालकांची गर्दी पाहून अजित पवारांनी संचालकांना मागे सारले.

अजित पवार पुढे आले आणि संचालकांना मागे ढकलले.यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात.

आता अजित पवारांच्या या मिश्कील कृत्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related News