अजित पवार गट जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज!

अजित पवार

अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा

निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली

आहे. या यादीत पक्षाने 16 उमेदवार उभे केले आहेत. येथे राष्ट्रवादी

Related News

काँग्रेस (अजित पवार गट) भाजपपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणूक

लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत.

याआधी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता पक्षाने

दुसऱ्या टप्प्यासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या महिन्यात

राष्ट्रवादीने (अजित पवार गट) पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

राष्ट्रवादीने (अजित पवार गट) जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमधून वकिल मोहम्मद अल्ताफ,

हजरतबलमधून हनीफ खान, खानयारमधून निसार अहमद, हब्बकन दाईमधून

जाहिद बशीर, लाल चौकातून समीर अहमद, चेनापोरामधून हाजी परवेज,

जदीबलमधून रियाझ अहमद, इदगाहमधून कैसर अहमद यांना उमेदवारी

दिली आहे. सेंट्रल नूर मोहम्मद शेख, बडगाममधून संजय कौल, बिरवाहमधून

नझीर अहमद, खान साहिबमधून शहनाज हुसैन, चरार-ए-शरीफमधून अब्दुल सलाम,

चधुरामधून तारिक अहमद, रियासीमधून ताराचंद आणि माता वेष्णोदेवीमधून

अशोक कुमार यांना तिकीट देण्यात आले आहे. याआधी, पहिल्या यादीत अजित पवार

यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधील त्राल, पुलवामा आणि राजपुरा

विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पक्षाने त्रालमधून

मोहम्मद युसूफ हझम यांना उमेदवारी दिली होती. पुलवामा येथून इश्तियाक

अहमद शेख यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय राजपुरामधून

अरुण कुमार रैनाच्या नावाची घोषणा करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये एनडीएचा

भाग असलेल्या राष्ट्रवादीने (अजित पवार गट) भाजपपासून वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/high-court-refuses-to-give-instructions-to-give-emergency-certificate/

Related News